Business Listing Process
नमस्ते!
सौमित्र सोबत उद्योजक मित्र म्हणून जोडण्याची इच्छा व्यक्त केल्याबद्दल आम्ही आपले मनःपूर्वक आभार मानतो.
सौमित्र (Website & Application) वर आपला व्यवसाय नोंदणी करण्यापूर्वी आम्ही आपल्याला एक विनंती करतो की (VICSPL) कंपनीला तुमच्या व्यवसायाची सविस्तर माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. कारण, तुमच्या प्रमाणेच आमच्या App वरील नोंदणीकृत ग्राहकांना योग्य दर्जाची उत्पादने आणि सेवा मिळाव्यात याची खात्री (VICSPL) कंपनीच्या वतीने आम्ही देत आहोत.
(VICSPL) कंपनीची संकल्पना ही मुख्यतः ग्राहक-केंद्रित आहे. ग्राहकांचे हित हेच सर्वांच्या फायद्याचे असल्याचे आम्ही मानतो. त्यामुळे उद्योजकांनी (VICSPL) कंपनीच्या नियम, अटी आणि करारपत्रातील सर्व बाबींची पूर्तता करणे अनिवार्य आहे.
उद्योजकांनी (VICSPL) कंपनीसोबत Affiliate Marketing तत्वावर व्यवसाय नोंदणी करण्यासाठी आम्ही एक सर्वसमावेशक करारपत्र तयार केले आहे. खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही (English & मराठी) या दोन्ही भाषांमधील करारपत्र समजून घेऊ शकता आणि योग्य निर्णय घेऊ शकता।
जर करारपत्रातील नियम – अटी – सूचना तुम्हाला मान्य असतील आणि तुम्हाला सौमित्र App ची कार्यप्रणाली सविस्तर जाणून घ्यायची असेल, तर सर्वप्रथम खालील बटनवर क्लिक करून सौमित्र App आपल्या मोबाईलवर डाउनलोड करून घ्या।
App मध्ये तुमचा व्यवसाय ग्राहकांपर्यंत कसा दिसेल याची खात्री करून घ्या।
आणि जर तुम्हाला सौमित्र App वर उद्योजक म्हणून नोंदणी करायची असेल, तर सर्वप्रथम तुम्हाला ग्राहक म्हणून नोंदणी करावी लागेल. कारण (VICSPL) कंपनीचा उद्देश सौमित्र App च्या माध्यमातून उद्योजक आणि ग्राहक यांचा एकनिष्ठ असा महासंघ निर्माण करणे हा आहे।
तुम्ही एक निर्णय घ्या – सौमित्र App वर तुमचा व्यवसाय नोंद करा; आणि तो यशस्वी करण्याची जबाबदारी आम्ही घेतो।
सौमित्र वर व्यवसाय नोंदणी प्रक्रिया :
- सौमित्र App डाउनलोड करा।
- App मधील Menu Bar वर क्लिक करा।
- “Register Your Business” या Link वर क्लिक करा।
- तुमचे नाव आणि मोबाईल नंबर देऊन Signup करा।